फलटण | धैर्य टाईम्स |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने डी. पी. भोसले महाविद्यालय कोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण येथील विध्यार्थी गणेश महादेव सोडमिसे (बीए भाग 2) शुभम निमगिरे (बीएभाग 2) या खेळाडूंनी विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तसेच ग्रीको रोमन या स्पर्धेत जयंत शेडगे (बीए भाग तीन) या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला असून जय सचिन कापसे (बीकॉम भाग) एक याने तृतीय क्रमांक मिळून यश संपादन केले.
या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके),संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), महाविद्यालयाच्या प्र प्राचार्य डॉ.सौ.तेजश्री राऊत (पवार) समन्वयक प्रा.राजेंद्र कुलकर्णी तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडू व महाविद्यालयाचे क्रीडा विभाग समन्वयक हरिष बेडके यांचे अभिनंदन केले आहे.