फलटण : धैर्य टाईम्स
आगामी नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून मंगेश बेंद्रे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची प्रबळ शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंगेश बेंद्रे हे सध्या फलटण शहर व्यापारी संघटनेचे खजिनदार म्हणूनही सक्रिय आहेत. फलटण व्यापारी संघटनेचे समाजकार्य, व्यावसायिक क्षेत्रातील योगदान आणि जनसंपर्क यांमुळे त्यांच्या नावाला स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहर खाटीक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. समाजाप्रती सक्रिय काम करण्यामध्ये त्यांचे नावं अग्रक्रमाणे घेतले जाते. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे समाजाकडूनही त्यांना हिरवा कंदील मिळाला आहे.
पक्षातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपमध्ये त्यांच्या उमेदवारीला वरिष्ठ पातळीवरूनही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. त्यामुळे प्रभाग ३ मध्ये बेंद्रे यांच्या प्रचाराची तयारी आधीपासूनच सुरू झाली असून, स्थानिक पातळीवर त्यांच्याविरोधात कोणताही ठोस विरोध दिसत नाही.
मंगेश बेंद्रे यांचा खाटीक समाजाशी असलेला दुवा, व्यापारी वर्गातली पकड आणि भाजपमधील निष्ठा या तिन्ही गोष्टींमुळे त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. त्याचबरोबर दीपक सरगर व जितेंद्र आप्पा सरगर हे सुद्धा भाजपा कडून उमेदवारी करिता इच्छुक आहेत.
प्रभाग ३ मध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी बेंद्रे हे प्रभावी चेहरा ठरण्याची शक्यता आहे.