फलटण प्रतिनिधी :
काळेश्वर दूध संस्था अडचणीत आली म्हणून ती आवसायनात निघेल त्यासाठी संस्थेची जागा विकली यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत असून, शिवरूपराजे तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन उत्तरे का देताय, तुमच्यात दम आहे तर समोरासमोर येऊन काळेश्वर मंदिरात या तिथंच काय खरं अन काय खोट ते करू असे जाहीर आव्हान आसूचे भाजपचे युवानेते विशालसिंह माने पाटील यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांना दिले.
काळेश्वर दूध संस्थेच्या विकलेल्या जमिनीबाबत सर्व पुराव्याणीशी झालेल्या काळेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत विशालसिंह माने पाटील बोलत होते यावेळी हरिश्चंद्र पवार,अजय फराटे, प्रमोद झांबरे, स्वामिनाथ साबळे, विठ्ठल माने, श्रीकांत शेडगे, सुभाष एतकाळे, राजेंद्र गोफणे,गोजाबा शेंडे, हणमंतराव खारतोडे, रमेश गोफने, संजय पवार, बाबुलाल शेख, नवनाथ कुंभार, धनंजय घोरपडे, नाथाजी गोफणे, धनंजय बोडरे यांचेसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विशालसिंह माने म्हणाले, समोरासमोर येऊन बोलण्याची तुमच्यात ती हिम्मत नाही, अजून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, आता फक्त विकलेल्या जमिनी बाबत बोलतोय परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला खूप उत्तरे द्यायची आहेत. अहो तुम्ही कधी खिशातून 47 रुपयांची वर्गणी दिली नाही, अन तुमचा चेला सांगतोय की 47 लाख रुपये परत करू, त्या चेल्याला सहकारातल काय कळतं? असा सवाल यावेळी माने यांनी उपस्थित केला.
विशालसिंह माने पुढे म्हणाले, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी शासकीय किमतीपेक्षा कमी रक्कमेचा दस्त केला, तुमच्या मुलाने संस्थेत सचिव म्हणून काम केले, परंतु पगार घेतला नाही,ऑडिट रिपोर्ट मध्ये पगाराची देणेबाकी दाखवली आहे,त्याच संस्थेचे संचालक हा लिलाव घेतात जे वर्तमानपत्र गेली दीड ते दोन वर्षे झाली गावातच येत नाही, त्या वर्तमानपत्रात जाहीर निविदा देताय, ते कोणत्या वर्गात येते? ती जाहिरात तिघेच वाचतायत अन पाच पाच हजाराने फरकाची बोली लावतात,याचा अर्थ ग्रामस्थांना किंवा सभासदांना जाणूनबुजून अंधारात ठेवताय, जागा घेणाऱ्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत विचारताय की जागा माघारी देणार का, तो म्हणतोय पैशे वाढवून आले पाहिजेत, तो तुमच्या घरी गेली अनेक वर्षे दिवाणजी म्हणून काम करतोय,हे सर्वांना माहित असून, शिवरूपराजे तुम्ही आत्तापर्यंत अनेक संस्था व सर्वसामान्य लोकांना लुबाडले असून तुमचा आता घडा भरलाय, ती जागा संस्थेला परत दिली नाही तर तुम्हांला जिथून आला आहात तिथं परत पाठवण्याची तयारी आता आम्ही केली आहे, असा घणाघात विशालसिंह माने पाटील यांनी केला.