फलटण प्रतिनिधी : क्राईम न्यूज
सांगवी येथील एका तरुणास लग्न लावून देतो असे म्हणून पळवून नेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ रोजी १२:३० वाजण्याच्या पूर्वी मौजे सांगवी ता. फलटण गावाच्या हद्दीत फिर्यादी तानाजी नाना घोलप (राहणार सांगवी तालुका फलटण) यांचा लहाण मुलगा प्रथमेश तानाजी घोलप (वय १८ वर्षे ६ महिने व्यवसाय शिक्षण रा. सांगवी ता. फलटण) याचे फिर्यादी चे मेहुणीची मुलगी नंदीनी अमोल गायकवाड हीचेशी प्रेम संबंध असल्याने दिनांक २७ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास अमोल बबन गायकवाड (वय ४२ रा.जंगशन साईनगर ता. इंदापूर जिल्हा पुणे), समीर महादेव सोनवणे (वय ३३), अजय अरुण सोनवणे (वय ३४), अरुण साहेबराव सोनवणे (वय ६६) (सर्व राहणार -सणसर भवानीनगर ता. इंदापूर जिल्हा पुणे) हे सर्वजण फिर्यादी यांच्या सांगवी येथील घरी आले व प्रथमेश याला "तु आमचे सोबत चल तुझे नंदीनीशी लग्र लावुन देतो" असे म्हणाले असता फिर्यादी त्याना म्हणालो की "आम्ही सर्वजण यावर चर्चा करून तुम्हाला नंतर सांगतो" परंतु फिर्यादी चे काहीएक न ऐकता अरुण सोनवणे याने प्रथमेशच्या हाताला धरुन ओढत नेवुन जबरदस्तीने गाडीत बसवले व भवानीनगर सणसर ता. इंदापुर येथे घेवुन गेले व प्रथमेश यास घेवुन जात असताना ते प्रथमेश यास दमदाटी करून म्हणाले की "तु नंदीनी सोबत बोलायचे नाहीस नाहीतर तुझे विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देईन, तसेच आम्ही नंदीनीचे लग्न तुझे सोबत लावणार नाही" असे म्हणुन त्यास त्रास देवुन त्याला त्याचे जगणे मुश्कील केल्याने त्यास आत्महत्येस प्रवृत्त केले असता दिनांक २८ रोजी १२:३० वाजण्याच्या सुमारास सांगवी तालुका फलटण गावच्या हद्दीत प्रथमेश तानाजी घोलप यांनी घराचे पत्र्याचे लोखंडी अँगल ला ओडणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्म्हत्या केली.
याप्रकरणी दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून एका गुन्ह्यात फिर्याद तानाजी नाना घोलप यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून याप्रकरणी चार जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पळवून नेहून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिक्षित करत आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी प्रसाद तानाजी घोलप यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पो.हा अडसूळ करत आहेत.