फलटण | धैर्य टाईम्स :
फरांदवाडी ता. फलटण येथील जयमल्हार लॉज येथे उपविभागीय पोलस अधिकारी राहुल धस यांनी त्यांच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात वेश्याव्यवसाय करत असलेल्या संशयित आरोपीकडून १ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दोन जणांना अटक केली असून याप्रकरणी एकूण तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५/०१/२०२५ रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमाराला फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फरांदवाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत जयमल्हार लॉज येथे उपविभागीय पोलस अधिकारी राहुल धस यांनी व त्यांचे पथकातील स.पो. फी. अहिवळे, पो.ना शेख, पो.कॉ लयटे, मपो कॉ तळपे, पो.हवा.भोसले, पो.कॉ पवार, पो.कॉ काकडे, चापोकॉ नाळे व मपोकॉ वलेकर यांनी या ठिकाणी छापा टाकुन वेश्याव्यवसाय करत असलेले संशयित आरोपी १) प्रविण रंगराव पवार (वय ३५ वर्षे रा.विडणी ता. फलटण जि.सातारा) २) दिपक दत्तात्रय धायगुडे (वय २८ वर्षे रा. सरडे ता. फलटण जि. सातारा) व ३) राहुल सुर्यकांत सरगर (वय ५० वर्षे रा.मलटण ता. फलटण जि.सातारा) यांच्यावर भा.न्या.स. व मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे कारवाई केली असून एका महिलेची सुटका केलेली आहे.
यातील राहुल सुर्यकांत सरगर हा संशयित आरोपी फरारी असून दोन आरोपींना अटक करून त्यांचेकडून १ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरबाबत म.पो.कॉ.वलेक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय फलटण निर्भया पथक यांनी तक्रार दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय फलटण येथील व निर्भया पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी फलटण तालुक्यातील सर्व पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांचेवर लक्ष ठेवून ते नक्की काय करतात याबाबत दक्षता घ्यावी व अशाप्रकारचे कोणी अवैध धंदे फलटण तालुक्यात व उपविभागात करीत असतील तर त्याबाबतची माहिती तात्काळ देणेत यावी असे धंदे करणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाईल कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सांगितले.