फलटण प्रतिनीधी:- दारूची चोरटी विक्री करत असताना एक जणांस ग्रामीण पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली असून त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरवडी गावचे हद्दीत खानावळीचे आडोशाला संशयित आरोपी विमल कुंडलिक धायगुडे ( रा सुरवडी ता. फलटण जि. सातारा मूळ रा. बाळू पाटलाची वाडी ता खंडाळा जि सातारा) याच्याकडे ५६० रुपये किमतीचा प्रोव्ही माल आढळून आला. यामध्ये एका पांढरे रंगाच्या पिशवीमध्ये देशी दारू सखु संत्रा टॅंगो प्रीमियम प्लास्टिकच्या ९० मिलीच्या १६ बाटल्या बेकायदा बिगर परवाना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे बाळगलेले स्थितीत मिळून आल्या याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मयुरी सुरेंद्र म्हेत्रे यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पो.ह पिसे करत आहे.