कराड : प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध श्री महावीर फरसाणा मार्टचे मालक कनकलाल तुलसीदास कंदोई यांचे वयाच्या ७९ वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी भावनाबेन, मुलगा जितेंद्र, तीन विवाहित मुली, पाच भाऊ, पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गुजरातच्या कच्छ विभागातून येवून कनकलाल कंदोई हे ऐन उमेदीत कराडला आले. त्यांनी फरसाणा बनवण्याचा व विक्रीचा व्यवसाय केला. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ फरसाणा बनवणारे कणकलालभाई यांच्या हाताला भारी चव असल्याचे त्यांच्याकडून आवर्जून फरसाणा नेणारे ग्राहक सांगतात. उत्तम दर्जा आणि खमंग, चटकदार खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देणे हे त्यांच्या व्यावसायिक यशाचे गमक होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.