फलटण :- फलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार भरवण्याचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. मागील काही आठवड्यांपूर्वी माळजाई मंदिर परीसरात भरणारा बाजार फलटण नगरपरिषदेने उमाजी नाईक चौक, गजानन चौक आणि रविवार पेठ या ठिकाणी बसवण्यासाठी आदेश दिले होते. एका दिवसाच्या आठवडी बाजारामुळे एकीकडे व्यापारी वर्गाचे होत असलेले नुकसान हे एक प्रमुख कारण सांगण्यात येत होते तर दुसरीकडे भाजी विक्रेते व नागरिक यांचा यास विरोध होता. तरीही भाजी विक्रेते व नागरिक यांचा विरोध दुर्लक्षित करत नगर परिषदेने उमाजी नाईक चौक, गजानन चौक आणि रविवार पेठ या ठिकाणी बाजार भरवण्यास सुरुवात केली शेतकरी व भाजी विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार नवीन ठिकाणी ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने भाजी विक्री खूपच कमी होत असल्याने सागण्यात येत आहे.
मागील काही बाजार आठवड्यात शेतकरी व भाजी विक्रेते यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी व भाजी विक्रेते यांनी आज सकाळी प्रशासनाच्या विरोधात जाऊन थेट माळजाई मंदिराच्या समोर जाऊन भाजी विक्री करण्यास सुरुवात केली.माळजाई मंदिराच्या समोरचे ठिकाण हे मोक्याच्या ठिकाणी असून शहराच्या मध्यभागी असून प्रशस्त जागा असल्याने भाजी खरेदी विक्री करण्यासाठी विक्रेते व ग्राहकांसाठी सुलभ आहे. माझाही परिसरात भाजी विक्री चांगली होत असल्याने शेतकरी व भाजी विक्रेत्यांच्या हिताचा विचार करूनच कोणताही निर्णय घेतला पाहिजे असे भाजी विक्रेते व शेतकरी यांची मागणी असून नगर परिषदेने भाजी विक्रेते व शेतकरी यांच्यावर दंडलशाहीने कारवाई न करता माळजाई परिसरात भाजी विक्री करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी होत आहे.
येणाऱ्या काळात नगरपरिषदेने आठवडा बाजार भरवण्याच्या विचारावर कायमचा तोडगा काढण्यासाठी शेतकरी व भाजी विक्रेत्यांशी बैठका घेण्याचे आश्वासन दिले असून शेतकरी व भाजी विक्रेत्यांच्या तसेच नागरिकांच्या मागण्याचा विचार करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा केली.माळजाई मंदिराच्या समोर आठवडा बाजार भरवावा अशी मागणी होताना दिसत आहे.
गाळेधारक व्यापारी दुकानासमोर गाडी लावतात तर कचराही जाणीवपूर्वक दुकानां समोर टाकला जातो असे महिला भाजी विक्रेते सांगतात. तर अनेक गाळेधारक व्यापारी त्यांच्या गाळ्यासमोर दुकान लावल्यामुळे घाण पाणी मालाच्या खाली सोडत आहेत तर भाजी विक्री होत नसल्याने अंगावर वीस ते तीस हजारांचा बोजा आल्याने दलाल माल देत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचे महिला भाजी विक्रेत्या यांनी सांगितले.
फलटण शहरातील बहुसंख्य नागरिकांनी माळजाई परिसरात भाजी विकण्यास परवानगी देण्याची मागणी केली असून फलटणच्या नागरिकांना माळजाई परिसर हा भाजी खरेदी करण्यासाठी सुटसुटीत व सुलभ वाटत आहे.