Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ? गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेक प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

सचिन यादव यांना शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर : खा.शरद पवार यांच्या शुभहस्ते होणार सन्मान

टीम : धैर्य टाईम्स

धैर्य टाईम्स,| विशेष वृत्त,| 

 के बी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना यंदाचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते लोणंद येथील शरद कृषी महोत्सवात रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी प्रदान होणार असल्याची माहिती के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर हेमंत खलाटे पाटील यांनी दिली.

मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शिरवली ता. बारामती येथे २४ डिसेंबर १९७७ रोजी सचिन यादव सर यांचा जन्म झाला. वडिलांचा शेती व्यवसाय असल्यामुळे शेतीशी त्यांची बालपणापासूनच अतूट नाळ जोडली गेली होती. महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती येथे प्राथमिक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात महाविद्यालयीन, मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असताना शेतीतून निघणारे तुटपुंज्या उत्पन्नावर शैक्षणिक जीवनाची घडी बसवत असताना कराव्या लागलेल्या कसरतीच्या जखमा वेळोवेळी वेदना आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या कार्याची दिशाच जणू स्पष्ट करत होते. तत्पूर्वी महाविद्यालयीन शिक्षण बारामतीला घेत असतानाच बारामतीमधील प्रमुख हटिल व्यावसायिकांना घरचा पशुपालनाचा जोडधंदा असल्यामुळे दुधाचा पुरवठा घरूनच केला जात होता. त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू कमी वयातच घरातून मिळाले होते. महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असतानाच भेंडी व बेबीकॉर्न या दोन पिकाशी १९९४-९५ साली पासूनचा निकटचा संपर्क होता. शैक्षणिक टप्पा पार पडल्यानंतर सरांनी कारकिर्दीला सुरुवात केली ती डी. वाय. पाटील ट्रस्ट द्वारे. कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर येथे नेहमीच नवनवीन शिकण्याची ओढ त्यांना कधीच शांत बसू देत नव्हती, यातून अधिकाधिक वाचनही त्यांनी केले त्यामुळे नवनवीन कल्पना व संकल्प यांना एक दिशा भेटत गेली. यात प्रमुख भर पडली ती म्हणजे २००८ साली, के. बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनलची पायाभरणी फलटण तालुक्यात झाली. याच एक आव्हान म्हणून स्वीकार करत शेतकऱ्यांना अगदीच नवख्या असणाऱ्या एक्स्पोर्ट या विषयी माहिती पोहोचवण्यासाठी घड्याळालाही लाजवेल अशी कामगिरी करत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अडचणी समजून घेत एक्स्पोर्ट संदर्भात रेसिड्यू फ्रि उत्पादनांची संज्ञा प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये बिंबवत शेतकऱ्यांना जणू भरारीसाठी पंखच दिले. खुर्चीला चिकटून राहण्यापेक्षा प्रत्येक्षात जिथे प्रोसेसिंग चालू असेल त्या ठिकाणी उतरून तिथल्या अडचणी समजून घेऊन त्या ठिकाणची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिकतेचा प्रयोग करून अजून दुपटीने उत्पादन क्षमता वाढवून कंपनी कामास वेग देणे, एवढेच नव्हे तर अगदी शेतकऱ्यांच्या वा युरोपात जाणाऱ्या माल वाहतूक वाहनांचे चेकिंग स्वतः करणे इत्यादी बारीक गोष्टीवर करडी नजर ठेवून आपले कार्य बजावत असत. हे करत असतांना सरांचा पेन आणि डायरी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. यातून त्यांच्या तत्परतेचे, बारकाईचे आपसूकच दर्शन घडते. रेसिड्यू फ्री कृषीमालाची निर्यात युरोपियन मार्केटमध्ये अव्वल क्रमांकाने चालू झाली. याच विश्वासाच्या बळावर आज भेंडीसोबतच डाळिंब, बेबीकॉर्न, आंबे, कडीपत्ता, दुधी अशा ताज्या पालेभाज्या व फळे यांची मोठ्या प्रमाणात होत असणारी मागणी व तितक्याच विश्वासाने ते अवघ्या २४ तासात भारतातून एक्स्पोर्ट केले जात आहे. यासोबतच अगदी विदेशी फळ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन फ्रुट देखील निर्यात करत आहेत. युरोपात निर्यात करत असताना घातक रासायनिक कीटकनाशकांचे अंश यामुळे अडथळे निर्माण होतील याची चाहूल लागताच शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी सचिन यादव सर यांनी विविध तज्ञ शास्त्रज्ञांना सोबत घेऊन विविध वनस्पतीच्या अल्कोलॉइड्स पासून वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके बनवणाऱ्या के. बी. बायो आरमनिक्स प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. यामुळे आज शेतकऱ्यांना निरोगी व निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन मिळवण्यासाठी बाजारात एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या औषधांच्या वापरामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी मालाचा वापर म्हणजेच फळे भाजीपाल्याचे सेवन करणाऱ्या सामान्य नागरिकांना देखील रसायनमुक्त अन्न मिळविणे सोपे झाले आहे. या कंपनीच्या स्थापनेमुळे फलटण, बारामती, पुरंदर, इंदापूर, माण-खटाव, माळशिरस तालुक्यातील तसेच भारतातील इतर राज्यातील हजारो कुशल अकुशल कामगारांच्या हाती काम देण्याच भाग्य यांनी मिळवले. आज जवळपास २००० युवकांना रोजगार पुरवण्याचे कार्य कंपनीच्या माध्यमातून केले जाते. कंपनीने कमी कालावधीत उत्तुंग अशी भरारी घेत भारतातील १४ प्रमुख राज्यांमध्ये कंपनीची सुरुवात करत शेतकऱ्याचे एक विश्वासाचे केंद्रच या राज्यांमध्ये पोहोचल्याचा आनंद शेतकऱ्यांना मनोमन के. बी. बायोच्या माध्यमातून वाटत आहे. अधिक जलद गतीने सेवा प्रदान करता यावी यासाठी इंदोर (मध्यप्रदेश) येथे ऑफिस स्थापनाही करण्यात आली आहे व देशाची राजधानी दिल्ली येथे लवकरच कंपनीच्या नवीन ऑफिसची स्थापना करण्यात येणार आहे. भविष्यावर नजर ठेवत वर्तमान व भविष्यकाळात रसायनमुक्त उत्पादने प्रत्येक भारतीयाच्या ताटात पोहोचावीत यासाठी न्यू एज ॲग्री इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड व ग्रीन इरा या दोन कंपनीची कंपनीची स्थापना करत सरांची विचारांची सखोलता अजूनच मनामध्ये स्थान वाढत जाते. त्याचबरोबरच १०० एक्स आयुर्वेदा या फार्मासिटिकल कंपनीची स्थापना करून भविष्यात याही क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. 

कोरोनासारख्या महामारीमध्ये असंख्य कुटुंबांना घरगुती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या धान्य, किराणा स्वरूपात किट वाटप सरांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले. लगोलग कोल्हापूर, सांगली, कोकण भागात आलेल्या महापुरात सुद्धा सचिन यादव यानी कंपनीतर्फे विविध लोकांना मदतीचा हात दिला. एवढेच नव्हे तर कंपनी एक कुटुंब समजून प्रत्येकाच्या अडीअडचणीत सर सर्वप्रथम उभा असतात. जिथे डॉक्टर प्रयत्न सोडतात तिथे सर स्वतःची यंत्रणा कामाला लावून डॉक्टरांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याची अनेक उदाहरणे आहेत. अवेळी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या जाण्याने होणारी दशा व सरांना भेटून त्यांच्या व्यथा सांगताना दर्यादिल सरांच्या मनाची हळहळ होणे साहजिकच होते. यावर उपाययोजना व आरोग्याच्या संबंधित कोणावरच अशी वेळ या तक्रारच येऊ नये, यासाठी वनस्पतींचा वापर करून बनविलेली कीटकनाशकांचा यशस्वी व क्रांतिकारी प्रयोग झाल्यानंतर लवकर आयुर्वेदाच्या धर्तीवर वनस्पतींचा वापर करून मानवी जीवनातील दुर्धर आजार व रोगांवर उपचार करण्यासाठी १०० एक्स आयुर्वेदा प्रा. लि. या नवीन कंपनीची सुरुवात त्यांनी केली आहे . असा हा त्यांचा तेजोमय प्रवास दिवसेंदिवस अधिक वेगाने संबंध शेतकरी, मानव जातीच्या सेवेसाठी भारताबरोबर संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी अधिक वेगाने सक्रियपणे प्रयत्नशील राहणार आहे.


Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER