फलटण शहराच्या मध्यवर्ती जुन्या डी.एड. चौकात अस्सल झणझणीत गावरान मटण त्याच्या सोबत गावठी बाजरी ज्वारीची भाकरी आणि इंद्रायणीचा रुचकर भात हे नुसतं ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. फलटणच्या नॉन व्हेज प्रेमींसाठी ही मेजवानी सुरू झाली आहे. अनेक जण या ठिकाणी ताव मारण्यासाठी येत असतात. मटण खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आहे, असं येथील ग्राहकांनी सांगितलं. या मटणासोबत गावठी बाजरी ज्वारीची भाकरी मिळते. त्यामुळे खवय्ये अगदी आवडीनं सर्व मेनूवर ताव मारतात.
घरगुती चव कारणाचे संपूर्ण बोकडाच्या मटणसह झिंगा चटणी, फिश, चिकन, खिमा,काळा मसाला रस्सा, तांबडा मसाला रस्सा, आळणी रस्सा, काळा मसाला फ्राय, तांबडा मसाला फ्राय, चिकन तंदूर, आदी मांसाहारी पदार्थासह इंद्रायणी तांदाळाचा भात, बाजरी व ज्वारीची भाकर,अस्सल तुपातील चपाती, रोटी, बटर रोटी, बटरनान, ही या ठिकाणी मिळतात. अस्सल गावरान पदार्थांची चवच न्यारी… ‘आम्ही सर्व पदार्थ हे गावरान पद्धतीने बनवत असतो त्यामुळे त्याला छान चव येते,आणि स्वादिष्ट ही लागतात. बऱ्याच दूरवरून नॉनव्हेज प्रेमी अस्सल गावरान मटणाची चव चाखण्यासाठी येत असतात. आम्ही साहित्य ही चांगल्या दर्जाचे वापरतो. सर्व मसाले हे घरगुती असतात. त्यामुळे आमच्या इथे जेवण केल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही, असे येथील व्यवस्थापक यांनी सांगितले.
मच्छी खाताना अधूनमधून मच्छी रस्सा आणि अळणी सूपचा आस्वाद, तर मग जेवणाची गंमत वाढत जाते. मच्छि मसाला, भाकरी आणि रस्सा हे त्रिकूट आपल्या जेवणाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. मच्छिचे विविध प्रकार खाताना फक्त थोडी काळजी घ्यावी लागते. चुकून एखादा काटा पोटात जायला नको म्हणून कडक फ्राय चिलापी खाताना जरा जपून खावा लागतो इतकंच.
बाकी भाकरीनंतर भातावर आडवा हात मारण्याची वेळ येईपर्यंत आपलं पोट तुडुंब भरलेलं असतं आणि आपण आडवे होण्याच्या बेतात आलेलो असतो. एक अप्रतिम अनुभव पाठिशी घेत आणि पोटात नि मनात साठवून आपण खाणावळीतून बाहेर पडतो.
तुम्ही जर कधी जेवणाच्या वेळी फलटणला गेलात, तर जरूर भेट द्या... खास जेवणासाठी गेलात तर मग उत्तमच. कसेही जा, कधीही जा, तुम्हाला अवी हॉटेलची चव आणि वैविध्य नक्की आवडेल.
येथील स्टाफही अगदी नम्रपणे काम करतोच करतोच परंतु हॉटेलचे मालकही ग्राहकांची आग्रहाणे विचारपूस करतात. त्यामुळे अवी हॉटेलची जेवणाची गंम्मतच भारी.... तर मग येताय ना.... हॉटेल अवीला..
अधिक माहितीसाठी संपर्क - 9545653479