फलटण प्रतिनिधी : गिरवी ता. फलटण येथे अवैध दारू विक्री व्यवसाय सुरु आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून यापुढे कायमस्वरूपी अवैध दारू विक्री बंद करुन उचित कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन सौ. वैशाली बापूराव निकाळजे व सिद्धार्थ नगर (निकाळजे वस्ती गावठाण) मधील इतर महिलांनी दिले आहे. या मागणीसाठी महिला आता आक्रमक झाल्या आहेत.
फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, सरपंच ग्रामपंचायत गिरवी यांच्यासह उत्पादनशुल्क अधिकारी फलटण यांना गिरवी येथील अवैध दारू विक्री कायम स्वरूपी बंदिचे निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वीही दिनांक २५/०६/२०२४ रोजीही दारू बंदिचे निवेदन दिल्याचे म्हटले आहे.