फलटण प्रतिनिधी :-
मौजे सांगवी चे ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ व दमदाटी करत कॉलर धरत सरकारी कामात अडथळे आणल्या प्रकरणी एका जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक १८ रोजी सायंकाळी ७:११ वाजता मौजे सांगवी तालुका फलटण गावाच्या हद्दीत संशयीत आरोपी राहुल हनुमंत चव्हाण (रा. सांगवी ता. फलटण) हा ग्रामपंचायत कार्यालय सांगवी मध्ये येऊन माझी रस्त्याची अडचण तुम्ही का सोडवली नाहीअसे म्हणून फिर्यादी ग्रामविकास अधिकारी गणेश दादासो दडस (रा. धुळदेव ता. फलटण) यांना शिवीगाळ दमदाटी केली व ऑफिसचे बाहेर निघून गेला पुन्हा ऑफिसमध्ये येऊन फिर्यादी ग्रामविकास अधिकारी गणेश दादासो दडस यांची कॉलर धरून फिर्यादी ग्रामविकास अधिकारी हे शासकीय काम करीत असताना शासकीय कामात अडथळा केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
संशयीत आरोपी राहुल हनुमंत चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत .