फलटण प्रतिनीधी -
खोट्या सह्या करून संमतीपत्राची नोटरी तयार करून फसवणुक केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि.13/03/2024 ते दि.10/12/2023 रोजी सकाळी 10.30 वा. चे सुमारास मारवाडपेठ, फलटण, ता फलटण, जि. सातारा येथे तसेच रावडी खुर्द, ता, फलटण, जि. सातारा येथे फिर्यादी श्रीमती लक्ष्मी महादेव शिंदे (वय 40 वर्षे, व्यवसाय घरकाम, मुळ रा.रावडी खु., ता.फलटण, जि.सातारा सध्या रा. मिरेवाडी ता.फलटण जि.सातारा) यांची पुतणी किमया केशव शिंदे (वय 22 वर्षे) हिने स्वत: चे नावे शंभर रुपयेचा स्टँम्प पेपर घेवुन त्यावरती मारवाड पेठ, फलटण येथे फिर्यादी श्रीमती लक्ष्मी महादेव शिंदे मुंबई येथे असताना फिर्यादीची खोटी सही करुन या खोट्या सह्यांच्या संमतीपत्राची नोटरी तयार करुन केशव रामचंद्र शिंदे (मयत) व किमया केशव शिंदे (वय 22 वर्षे, दोन्ही रा. रावडी खुर्द, ता. फलटण) यांनी संगनमताने सदरची नोटरी माळेगाव साखर कारखाना येथे देवुन फिर्यादीची तसेच माळेगाव साखर कारखान्याची फसवणुक केलेली आहे.
तसेच दिर केशव शिंदे (मयत) यांना सदर क्षेत्रातील ऊस फिर्यादीचे नावावर न पाठविता, फिर्यादिस कोणतीही कल्पना न देता आरोपी यांच्या नावावर का पाठविला, असे विचारले असता, फिर्यादी यांची मुलगी लतिका हीस दिर केशव शिंदे, जाऊ हेमा केशव शिंदे, पुतणी किमया केशव शिंदे यांनी शिवीगाळ, दमदाटी करुन "आधी बापाला घेवुन ये, मग जमिनीचा हिस्सा देतो" अशी धमकी दिली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोउपनि. एस.आर. शिंदे हे करीत आहेत.