फलटण : येथे गेली 27 वर्ष बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देणारे यश कंट्रक्शनच्या ऑफिसचा 18 डिसेंबर 2022 रोजी नवीन जागेत विधिवत स्थलांतर झाले.
या वेळी फलटण नगर परिषदेच्या जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया चे मा. चेअरमन रणधीर भोईटे, डॉ. सोनवणे, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे मा. चेअरमन प्रमोद निंबाळकर, आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
यश कंट्रक्शन ने फलटणच्या बांधकाम व्यवसायात आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. गेल्या 27 वर्षाचा बांधकाम क्षेत्रात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच बांधकाम क्षेत्रातील नवनवीन संकल्पना फलटण येथे रुजवण्याचे श्रेय कंट्रक्शनला जाते.
यश कन्ट्रक्शन च्या नवीन ऑफिस उद्घाटन प्रसंगी बांधकाम, वैदकीय, वकील, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवारानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यश कंट्रक्शन चे सर्वेसर्वा राजीव नाईक निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.