फलटण प्रतिनिधी: 24 एप्रिल, धैर्य टाईम्स
पोकलेन मालकास पोकलेन ऑपरेटर व ईतर पाच जणांची अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास काकाटे गॅरेज जिंती नाका फलटण तालुका फलटण येथे फिर्यादी श्रीकांत हनुमंत लुंगसे (वय 35 वर्षे राहणार लव्हे तालुका माढा जिल्हा सोलापूर) यांचा पोकलेनचा भूम स्टिक दुरुस्तीस आणलेला असताना पोकलेन चा ऑपरेटर सचिन मोहन काटे (राहणार वाफळे रस्ता बाबर वस्ती उपळाई बुद्रुक तालुका माढा जिल्हा सोलापूर) व अनिल दत्तात्रय घाडगे (राहणार बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) व इतर आनोळखी चार व्यक्तींनी सचिन काटे याची मोटार सायकल व मोबाईल घरी पोहोच कर असे धमकावून जोपर्यंत ती पोहोच करीत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही असे म्हणून श्रीकांत हनुमंत लुंगसे यांना सर्वांनी लाथाबुक्याने मारहाण करून स्कॉर्पिओ वाहनाने बारामती मार्गे जंक्शन येथे जबरदस्तीने घेऊन गेले याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.उप.नि. शिंदे करत आहेत.