या वर्षी आपण अनेक जीव जिवलगांना मुकलो आहोत. यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच माझ्या कुटुंबही काही दुःख घटना घडल्या असल्याने यावर्षी १४ जून रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट करतानाच सर्वांनी आपल्या घरी एक झाड लावावे असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सामाजिक माध्यमाद्वारे केले आहे.
पुढे असे म्हटले आहे की, माझ्या कुटुंबातील श्रीमंत अनंतमालादेवी बाईसाहेब महाराज, श्रीमंत वसंधुराराजे अक्कासाहेब, श्रीमंत भरती मनोहर नामजोशी (मिनूताईसाहेब ) श्रीमंत विनायक मनोहर नामजोशी, ( बाळदादा) यांच्या जाण्याने दुःखद घटना घडल्या आहेत. या प्रश्वभूमीवर दिनांक १४ जून रोजी होणारा वाढदिवस साजरा करणार नाही.
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपक्रमानुसार आपण सर्वांनी आपल्या घरी एक झाड लावल्याचा सेल्फी सामाजिक माध्यमाद्वारे प्रसिद्ध करावा तीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट ठरेल असे भावनिक आवाहन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.