वास्तविक पाहता लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी, रस्ते, शिक्षण, वीज, स्वच्छता देणे हे नगर परिषदेचे कर्तव्य आहे. मात्र आजही सोमवार पेठ येथील गटारांची दुरावस्था असल्याने नागरिकांना मोठा व सुविधेला सामोरे जावे लागत आहे.
फलटण :
सध्या फलटण नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने आणि अनेकांना नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र आज फलटण नगर परिषदेचा भाग असलेला सोमवार पेठ येथे घाणीचे साम्राज्य उभे राहिले आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही, अस्वच्छ गटारे व घाणीमुळे आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
सोमवार पेठ फलटण येथील गट नंबर 53 व 54 येथील गटारांची कामे तसेच स्वच्छतेचे कोणतेही काम गेल्या अनेक दिवसांपासून झाले नसल्याने येथील नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. येथील रहिवाशांच्या झोपडीवजा घरांमध्ये गटाचे पाणी घुसत असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील गटारांचा व स्वच्छतेचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा असे आवाहन लखन अडागळे, उपाध्यक्ष फलटण शहर, आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.