फलटण प्रतिनिधी :
फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट ) जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्या अल्पशा आजाराने पुणे येथील एका खाजगी दवाखान्यात निधन झाले. ते 78 वर्षाचे होते.
सामान्य लोकांचे दालन म्हणून त्यांची फलटण तालुक्यात विशेष ओळख होती. त्यांच्या पश्चात 7 मुली, जावई,एक मुलगा, सून, नातू असा मोठा परिवार आहे.
सुभाषराव शिंदे यांच्या निधनाने फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.