फलटण तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रशांत सुरेश गायकवाड यांची बहुमताने निवड झाली.निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी फटाक्यांची आतिषबजी व गुलालाची उधळण करण्यात आली.
मावळते उपसरपंच प्रदीप गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाच्या निवडीसाठी सरपंच जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत सत्ताधारी गटाकडून प्रशांत गायकवाड यांनी तर विरोधी गटाकडून विजया गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यानंतर निवडीसाठी मतदान घेण्यात आले.त्यामध्ये प्रशांत गायकवाड यांना १३ मते मिळाली.विरोधी उमेदवारास केवळ ३ मते मिळाल्याने प्रशांत गायकवाड यांची बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून भरत कोळेकर यांनी कामकाज पाहिले.त्यांना ग्रामविकास अधिकारी जी एम जाधव यांनी सहकार्य केले.
निवडीनंतर आमदार दीपक चव्हाण,माजी सभापती वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच जयश्री चव्हाण,पाणी पुरवठा अध्यक्ष विजयकुमार शहा,मावळते उपसरपंच प्रदीप गायकवाड,ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, रोहिदास गायकवाड, बाळासाहेब अडसूळ,राजेंद्र गायकवाड, मोहन अडसूळ,लक्ष्मणराव गायकवाड,वसंतराव अडसूळ,अंकुश कुलाळ, आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशांत गायकवाड यांची परिसरात वेगळी ओळख
गेली बरीच वर्ष प्रशांत गायकवाड हे परिसरात कार्यरत आहेत. वडील दिवंगत पत्रकार सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला छत्रपती साप्ताहिकाच्या माध्यमातून लेखन करीत सामाजिक क्षेत्राची त्यांना ओळख होत गेली.जनतेचे हित व प्रश्नाची जाणिव असल्याने ते राजकारण विरहित समाजकारण करीत आहेत. सूर्यतेज प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत.चांगल्या कार्यात नेहमी सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
जणतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. पदामुळे जबाबदारी वाढली आहे. लवकरच पालखी सोहळा येत आहे. ते मोठे आव्हान आहे. मिळालेल्या या संधीचा उपयोग आगामी काळात गावच्या विकासासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेवून निस्वार्थी भावनेने करीन.
प्रशांत गायकवाड, उपसरपंच तरडगाव