फलटण प्रतिनिधी:- लोणंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणंद मुले नंबर-१ शाळेमधील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. ऋज्वी अभिजित धुलगुडे हिने ३०० पैकी २७२ गुण मिळवत शहरी विभागातून राज्य गुणवत्ता यादीमध्ये सातवा क्रमांक पटकावला. तसेच प्रसन्न प्रवीण महामुनी याने २५० गुण मिळवत जिल्ह्यात १६ वा क्रमांक प्राप्त केला, हर्ष निलेश चौधरी याने २४२ गुण मिळवत जिल्ह्यात २० वा क्रमांक मिळविला, सोहम सर्जेराव धुलगुडे याने २३६ गुण मिळवत जिल्ह्यात २३ वा क्रमांक प्राप्त केला. तसेच श्रुती वैभव चव्हाण हिने २२४ गुण, श्रवण दयानंद क्षीरसागर याने २२२ गुण तर अथर्व सोपान तावरे १५४ गुण मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होण्याचा बहुमान मिळवला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका सौ. दिपाली सदाशिव निंबाळकर - भोसले, खंडाळा तालुका शिष्यवृत्ती मार्गदर्शन टीमचे श्री. पंकज रासकर सर आणि सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छाया क्षीरसागर, सर्व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.