फलटण प्रतिनिधी : जाधववाडी ( ता. फलटण) येथे ग्रामपंचायत सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाधववाडी (फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यामध्ये स्कुल बॅग व वह्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना वाटप करण्यात आल्या. तसेच शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांनी साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपसल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वर्गशिक्षक वसंत जाधव गुरुजी यांनी यथोचित सत्कार करुन आभार मानले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दारासिंग निकाळजे, माजी सरपंच मुनिष जाधव, उपसरपंच राहुल शिंदे, माजी सरपंच बाळासो शिंदे, माजी उपसरपंच दिपकराव सपकाळ, ग्रामपंचायत माजी सदस्य गोविंद घनवट सदस्या सौ.मंगलाताई घनवट, निलेश जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब महानवर, दादासो जाधव, सुरज शिंगाडे व जाधववाडी (फलटण) ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.