फलटण प्रतिनिधी :
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथे प्रात्यक्षिक व मुलाखत परीक्षेद्वारे भारतातून फक्त सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील इयत्ता ७ वी तील स्वराज सचिन फाळके याची निवड झाली आहे. या विद्यार्थ्याचे पुढील शिक्षण आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथे होणार आहे तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये यश भगवान खवळे इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे 15 ऑगस्ट 2025 रोजी सत्कार व अभिनंदन श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण व यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण च्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे उपाध्यक्ष सी एल. पवार सर, संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), मंगेश शेठ दोशी तसेच बाळासाहेब भोंगळे, तुषार गायकवाड उपस्थित होते
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या मार्गदर्शन मनोगतातून श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देत आलेले आहे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी दिले जाते. त्यामुळेच विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करत असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.