फलटण २८ नोव्हेंबर | धैर्य टाईम्स
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी कोळकी येथील विश्रामगृह येथे फलटण तालुक्यातील विविध शासकीय आस्थापनाचे प्रमुख अधिकारी यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. जिल्हा परिषद सदस्या ॲड.सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे,फलटण पंचायत समितीचे सतीश कुंभार आदी उपस्थित होते. यांच्यासह महसूल व पंचायत समितीचे प्रमुख विभागातील अधिकारी उपस्थिती होते.
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी मानून सर्व अधिकारी यांनी काम करावे अशा सूचना यावेळी आमदार सचिन पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी फलटण तालुक्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगून चुकीचे काम नकरता सकारात्मक काम करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी असे सांगितले.