संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा फलटण येथे 1व 2 जुलै रोजी मुक्काम आहे. त्यानिमित्त खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी फलटण च्या वतीने फलटण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराचा उद्घाटन सोहळा सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर,फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते, संतोष सावंत, राजेंद्र नागटिळे, मेहबूब मेटकरी, आरपीआयचे फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, महिला तालुकाध्यक्षा सौ. उषा राऊत, जंगम सर, राहुल शहा, रियाजभाई इनामदार, नितीन जगताप, बबलूभाई मोमीन, नितीन वाघ, वसीमभाई मनेर, रवी पवार, शशिकांत रणवरे, विशाल नलवडे, रणजीत जाधव, राजू काळे इत्यादी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आरोग्य शिबिरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील शेकडो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जाणार आहेत. आज सकाळपासूनच आरोग्यसेवेला सुरुवात झाली असून पालखी प्रस्थान होई पर्यंत ही आरोग्यसेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे.