फलटण प्रतिनिधि-
तीन वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये गेली असली तरीही गोरगरीब लोकांना मोफत अन्न - धान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये तर राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे 12 हजार रुपयांची पेन्शन देण्याचे काम केंद्र सरकारने केल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार केंद्रात येणार आहे तर सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून देशाचा विकास सुरू असल्याचे खासदार रणजितसिंह म्हणाले. माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे,जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे - पाटील, धनंजय - साळुंखे पाटील, अशोकराव जाधव, राजाभाऊ मदने, तुकाराम शिंदे,अंकुश चव्हाण, डॉ.सुभाष गुळवे, अभिजित नाईक निंबाळकर, तुकाराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले,केवळ एक रुपयांमध्ये शेतकरी विमा तर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा देण्याचे काम युती सरकारच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले. लोकसभेच्या निवडणूकीनंतर रामोशी समाजातील प्रश्न निश्चित सुटले जातील तर रामोशी समाजातील युवकांचे बेरोजगारीचे प्रश्न, गावगाड्यातील प्रश्न हे प्राधान्याने सोडविले जातील अशी ग्वाही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. महायुतीचे सरकार स्थापनेनंतर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे हे सरकार मध्ये दिसतील असे यावी खासदार रणजितसिंह म्हणाले. तर भविष्य काळातील राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पंचायत समिती, जिल्हा परिषद त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये रामोशी समाजातील युवकांना उमेदवारी देत राजकारणाच्या चाव्या रामोशी समाजाच्या हातामध्ये देण्याचे काम आपल्याला करावे लागेल असे यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. इतर समाजाच्या दृष्टीने रामोशी समाज हा पाठीमागे राहिलेला आहे त्या समाजाला पुढे नेण्याचे काम आपणा सर्वांना मिळून करावे लागेल असे यावेळी खासदार रणजितसिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मला विजयी कराल हा विश्वास शेवटी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, रामोशी बेडर समाजाचे 1,59,000 इतके मतदान माढा लोकसभा मतदार संघात आहे. तर रामोशी समाजाचे होणारे संपूर्ण मतदान हे खासदार रणजितसिंह यांनाच होणार असल्याचा विश्वास शितोळे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामोशी समाजाला सन्मान देण्याचे काम केले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच रामोशी समाज कायम असल्याचे शितोळे म्हणाले. माढा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात जय मल्हार संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन करणार असल्याचे यावेळी दौलतनाना शितोळे यांनी सांगितले.सांगितले.
महायुतीच्या माध्यमातून रामोशी समाज हा एक घटक म्हणून काम करीत असल्याचे दौलतनाना शितोळे यांनी निदर्शनास आणून देतानाच रामोशी समाज भाजपा बरोबर असल्याचे यावेळी शितोळे यांनी सांगितले.जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात निष्ठेने काम करावे अशी अपेक्षा यावेळी दौलतनाना शितोळे यांनी व्यक्त केली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी विष्णू चव्हाण प्रवक्ता जय मल्हार क्रांती संघटना,सौ.नंदा पाटोळे, संपत चव्हाण, राहुल मदने, बापू चव्हाण, दत्ताभाऊ चव्हाण, किरण जाधव यांच्यासह सांगोला, माढा, माण, माळशिरस, फलटण,या भागातील जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.