फलटण प्रतिनिधी : 26 एप्रिल - धैर्य टाईम्स
बारस्कर गल्ली येथील घरातून 92 हजार रुपये किंमतीची दागिने चोरून नेले प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 9 रोजी सकाळी 9 ते 24 रोजी सकाळी 11 वाजण्याचा सुमारास उर्मिला रामराव पेंदाम (राहणार बारस्कर गल्ली फलटण तालुका फलटण) यांच्या बारस्कर गल्ली, फलटण येथील घराचे हॉलमधील गोदरेजच्या उघड्या कपाटात ठेवलेले 22 हजार रुपये किंमतीचे साखळीतले सोन्याचे व काळे मणी तसेच दोन वाटया असलेली 11 ग्रॅम वजनाची मिनी मंगळसूत्र 30 हजार रुपये किंमतीचे एक दीड तोळा वजनाचा गळ्यातील डिझाईनचा नेकलेस 20 हजार रुपये किंमतीचे एक तोळा वजनाचा गळ्यातील लक्ष्मीहार 6 हजार रुपये किंमतीचे कानातले गोल आकाराचे टॉप्स तीन ग्रॅम वजनाचे 10 हजार रुपये किंमतीचे एक वेढण्याची पाच ग्रॅम वजनाची अंगठी 4 हजार रुपये किंमतीचे एक दोन ग्रॅम वजनाची ठोक्याची डिझाईन असलेली अंगठी अशी एकुण 92 हजार रुपये किंमतीची दागिने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले वरील वर्णनाचे व किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशी फिर्याद शहर पोलीस ठाण्यात उर्मिला रामराव पेंदाम यांनी दिली असून पो. ना. घाडगे अधिक तपास करत आहेत.