फलटण प्रतिनिधि :
माढा लोकसभा मतदार संघाचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच हेच होणार आहेत. पण दिड दमडीचे किताब देणारे महाशय ज्यांची पुन्हा नगरसेवक पदासाठी त्याच वार्डात उभे राहण्याची लायकी आहे का असा सवाल करीत दिवा कोणाचा विजणार हे फलटण तालुका ओळखून असून आदीच लक्तरे झालेला दिड दमडीचा वाचळवीराच्या नावावर बातमी देऊन काय साधनार? असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांच्यावर भारतीय युवा मोर्चाचे फलटण शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. प्रीतसिंह खानविलकर यांनी रामराजे समर्थनार्थ दिलेल्या बातमीचा नितीन जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकातून समाचार घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यावर रामराजे यांनी जहरी टिका केली होती यावर बोलताना नितीन जगताप म्हणाले की, अशोकराव जाधव ४ वेळा तर अनुप शहा ३ वेळा फलटण नगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत यांच्यावर टीका केल्याशिवाय आपली सभा पूर्ण होत नसल्याने यावर त्यांची काय किंमत आहे हे आपण समजावे असा उपरोधीक टोला जगताप यांनी लगावला आहे.
वरिष्ठ नेत्यांवर न बोलता आमची संस्कृती काही दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्यातील भाषणातून दाखवली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तर दुसयाने लिहीलेल्या बातम्याला आपले नावावर द्यायचे धंदे बंद करा असे आवाहन यावेळी जगताप यांनी दिले असून दिवा कुणाचा विझायला लागला आहे हे फलटण तालुका चांगले ओळखतोय तर रणजीतसिंह नाईक निंबाळकर हेच पुन्हा माढ्याचे खासदार होतील असे शेवटी प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.