नांदवळ ता. कोरेगाव येथील उंचपाण्याच्या टाकीचे भूमिपूजन प्रसंगी सुरु असलेल्या कार्यक्रमात राडा झाला. जागेच्या वादावरून हा राडा झाल्याची माहिती मिळत असून ऐनवेळी भूमिपूजन इतरत्र करावे लागल्याची नामुष्की संयोजकांवर ओढवली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आ. दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह काही मान्यवरांच्या उपस्थित झाले. मात्र कोणावरही अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया आ. दिपक चव्हाण यांनी दिली आहे.
पाण्याच्या उंचटाकी करीता जागा ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात आली आहे. मात्र जमिनीचे वाटपपत्र झाले नाही. त्याच ठिकाणी जुनी पाण्याची उंचटाकी आहे. भूमिपूजन प्रसंगी अचानक लोक आल्यामुळे आम्ही समजूतीची भूमिका घेऊन सदरचे भूमिपूजन इतर ठिकाणी केलेचे आ. दिपक चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणात कोणावरही अन्याय होणार नाही असे धैर्य टाईम्सशी बोलताना आ. चव्हाण म्हणाले.
नांदवळ येथे यापूर्वी मंजूर झालेले बुद्ध विहार राजकीय अंतर्गत गटबाजीमुळे पूर्ण होऊ शकले नाही. तर राजकीय गटबाजीमुळे आजचा प्रकार घडल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.