लोणंद प्रतिनिधी :
22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन सातारा च्या वतीने घेण्यात आलेल्या PRE-RDC कॅम्प मुलाखतीमध्ये 1750 विद्यार्थ्यांमधून SUO गणेश दशरथ ठोंबरे, कॅडेट अयाज रफिक सय्यद व कॅडेट भावेश कुमार यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या PRE-RDC कॅम्प साठी अभिनंदनिय निवड झाली आहे. यामध्ये शारीरिक, मानसिक क्षमतेचा चाचण्या घेण्यात आल्या तसेच एनडीए दर्जाचा मुलाखतीचा टप्पा पार करण्यात कॅडेट्स यशस्वी ठरले. ही कॅडेट ची मुलाखत 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे AO कर्नल नागेंद्र पिल्ले यांनी घेतली.
त्यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. मिलिंद (दादा) माने, सातारा जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती आनंदराव (मामा) शेळके, स्कूल कमिटी सदस्य डॉ. अजितकुमार वर्धमाने, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पदाधिकारी तसेच मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीचे सदस्य चंद्रकांत जाधव साहेब , उपप्राचार्य आबाजी धायगुडे सर, विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी कॅडेटचे अभिनंदन केले. NCC ऑफिसर लेफ्ट.महेश जाधव व विठ्ठल ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.