फलटण प्रतिनिधी : खासदार झाल्यानंतर केवळ 30 दिवसात लोणंद - फलटण ही अनेक वर्षांपासून प्रलंबित रेल्वेसेवा सुरु केली, तर फलटण तालुक्यातील रस्त्यांसह धोम- बकलकवाडीचे उर्वरित काम आपणाला करुन घेण्यास यश मिळाले, अशी अनेक कामे केली. मी मतदार संघात जनतेसाठी काम करतो म्हणूनच माझा पराभव करण्यासाठी शरद पवार यांच्या सह अनेक जण एकत्र आले आहेत मात्र शंभर शरद पवार एकत्र आले तरी माझा पराभव होऊ शकत नाही असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलून दाखविला. ते दुधेबावी, ता. फलटण येथे प्रचार दौऱ्यात बोलत होते. यावेळी ॲड.नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण - कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे - पाटील, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, तुकाराम शिंदे, सुशांत निंबाळकर, बाळासाहेब काशीद, सूर्यकांत दोशी, नानासाहेब आडके, धनंजय मोरे, आदी मान्यवर उपास्थित होते.
खासदार शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना लोणंद - फलटण रेल्वे प्रकल्प, मतदार संघातील रस्ते, धोम - बलकवडी, निरा - देवधर, जिहे - कटापूर योजना अशी अनेक कामे रेंगाळत ठेवली. मात्र हिच सर्वं काम मी खासदार झाल्यानंतर केल्यामुळेच माझा पराभव करण्यासाठीच खा. शरद पवार यांच्या सह अनेक जण एकत्र आले आहेत मात्र शंभर शरद पवार एकत्र आले तरी माझा पराभव होऊ शकत नाही असा विश्वास यावेळी खासदार रणजितसिंह यांनी बोलून दाखविला.
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, आपण फलटण तालुक्याला वेगळ्या उंचीवर नेहणार आहे. काही दिवसापूर्वीच निरा - देवघरच्या उर्वरित कामाचे टेंडर निघाले तर फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची कामे झाली आहेत अशी अनेक विकासाची कामे मला मिळालेल्या खासदार पदाच्या काळात केली. आपल्या तालुक्याला खासदारकी ठेवायची का असा सवाल उपास्थित करुन माझा प्रत्येक सहकारी हा खऱ्या अर्थाने खासदार असून तुम्हीच उमेदवार म्हणून पुढे या? असे भावनिक आवाहन यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केले.
लवकरच नवीन 13 जिल्यांची निर्मिती होणार असून त्यामध्ये फलटण या नवीन जिल्याची होईल असे खासदार रणजितसिंह म्हणाले
कोरोनाच्या काळात रशिया या ठिकाणी शिक्षणासाठी असलेले 250 ते 300 डॉक्टर आपल्या माढा मतदार संघात विशेष विमानाणे आणले असल्याचे यावेळी खासदार निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी सागर भिसे उपसरपंच दुधेबावी, वैशाली मदने,माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेकांनी भाजप मध्ये प्रवेश केला