फलटण प्रतिनिधी -
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी 23 तारखेला (सोमवार) फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे रास्ता रोको केला जाणार आहे. अशी माहिती नानासो तथा पिंटू इवरे यांनी दिली.
सोमवारी रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील शासकीय विश्रामभवन येथे बोलविण्यात आलेल्या बैठकीत रामभाउ ढेकळे,बजरंग गावडे,दादासो चोरमले,नितीन सुळ, भास्कर ढेकळे, ॲड. काशीद,व इतर समाज बांधव उपास्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. 2014 साली महायुतीचे सरकार असताना पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. आताही सरकार त्यांचेच आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.