सातारा, दि. १७ : जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे सन २०२५-२६ या शैक्षणीक वर्षासाठी इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठीची मुदत २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निवड चाचणी परिक्षेकरीता पुढिलप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. विद्यार्थी हा सातारा जिल्हयातील रहिवासी असुन शैक्षणीक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता ५ वी ३१ जुलै २०२४ पुर्वी शिकत असावा. विद्यार्थ्याचा जन्म १ मे २०१३ पुर्वी व ३१ जुलै २०१५ नंतर झालेला नसावा . अनुसचित जाती,जमाती, अपंग व इतर मागासवर्गासाठी जागा राखीव आहेत तसेच तृतीय पथींय सुध्दा अर्ज करु शकतात. सदर अर्ज भरण्यासाठी नवोदय विद्यालय समितीच्या http:navodaya.gov.in या लिंकवर अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याची अंतिम मुदत २३ सप्टेंबर २०२४ अशी आहे. परिक्षेची तारीख शनिवार दिनांक १८ जानेवारी२०२५ रोजी सकाळी ११.३० वा आहे. तरी पात्र विद्यार्थ्यानी ऑनलाईन