आजकालच्या युगाल तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. सर्व पालकांनी किंवा तरुण पिढीने आपल्या हातात असणाऱ्या त्या तंत्रज्ञानाचा वापर ज्ञान घेण्यासाठी केला पाहिजे. म्हणजेच आपण जे तांत्रिक किंवा संगणक प्रशिक्षण घेतो ते एखाद्या मान्यताप्राप्त असलेल्या म्हणजे शासनाने प्रमाणित केलेल्या संस्थांमध्ये घेतो का? हे तपासणे अतिशय महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी आपण मान्यतापत्र पाहतो मग आपण MS-CIT सारखा कोर्स करताना सुद्धा ते तपासणे गरजेचेच आहे की नाही?
MS-CIT चे अधिकृत सेंटर तपासणी अतिशय सोपी प्रक्रिया आहे. सर्वप्रथम आपण www.mkcl.org/mscit या वेबसाईट ला जाऊन Find center ला गेला असता महाराष्ट्रातील सर्व मान्यताप्राप्त एएलसीची यादी मिळते. मात्र पालकांना किंवा विद्यार्थ्यांना अशा गोष्टींची माहिती नसल्यामुळे अनधिकृत सेंटर याचा गैरफायदा घेतात व विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत असताना तंत्रज्ञानाच्या युगात आपण दक्षता घेतली पाहिजे. तसेच टॅलीसारखा कोर्स सुद्धा तुमच्या करिअरला दिशा देणार आहे तो कुठे करावा तर www.tallyeducation.com
या वेबसाईटला जाऊन लर्निंग सेंटर मध्ये सर्व टॅलीचे मान्यताप्राप्त सेंटर दिसतात फक्त तुम्ही जागरूक राहिले पाहिजे.
डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. ही एकमेव टॅली शिकवणारी संस्था तुम्हाला या वेबसाईटवर दिसेल. एवढेच काय आयुष्यभरासाठी तुम्हाला पोर्टल वर ॲक्सेस देणारी मान्यता पद्मश्री भारत गोयंका यांनी बनवलेली आहे त्याची माहिती नक्की करून घ्या.
डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. ही MS-CIT ची मान्यताप्राप्त संस्था असून गेली 24 वर्ष फलटण मध्ये कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्रात ज्यांना एमएस-सीआयटी व टॅलीची मान्यता हवी आहे अशा नवीन संस्थांना मान्यता देण्यासाठी गेली 24 वर्षांपासून कार्यरत आहे. तरी ज्यांना स्वतः व्यवसायात यायचे आहे त्यांनी संस्थेला अवश्य भेटावे. डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. ने गेली 24 वर्षात 25 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त कोर्सचे प्रमाणपत्र देऊन व्यवसाय व नोकरीसाठी तयार केलेले आहे व आजही हे कार्य सुरु आहे. त्यासाठी फलटणच्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
दिनांक 10 एप्रिल पासून डॉ.बी.आर. आंबेडकर आयआयटीने 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आपल्या देशातील महान कार्य करणाऱ्या महापुरुषांविषयी जागरूकता करण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने या जयंती साजऱ्या करण्यात आल्या.
डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी.
संचालिका - सौ. मनीषा शेखर कांबळे. (MBA, M.COM