फलटण प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणीवर वसीम इनामदार यांची निवड करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाशजी गाडे, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांचे सूचनेनुसार आज भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याची सोशल मीडिया कार्यकारिणी सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी यांनी जाहीर केली.
सध्याच्या राजकारणात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पक्षाचा कार्यकर्ता जसा ग्राउंड वर बूथ वर घरोघरी जाऊन काम करतो तसेच मोदी सरकार राज्यातील महायुती सरकार करत असलेली कामे जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम नवनियुक्त दायित्व मिळालेले कार्यकर्ते काम करतील असा विश्वास सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी यांनी व्यक्त केला.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाश गाडे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे भाऊ,जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, नरेंद्र पाटील साहेब, भरत पाटील नाना, विक्रम पावसकर,डॉ अतुल भोसले,मदनदादा भोसले सुनील काटकर तात्या मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, प्रियाताई शिंदे आदींनी अभिनंदन केले.