राष्ट्रवादीकडून विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र माता शिवाजीराव गर्जे अमरसिंह पंडित हेदेखील इच्छुक असल्याचे समजते आहे.
पुणे - (प्रतिनिधी )
विधान परिषद निवडणूक साठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. राष्ट्रवादीकडून विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र माता शिवाजीराव गर्जे अमरसिंह पंडित हेदेखील इच्छुक असल्याचे समजते आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची चर्चा असल्याचे राष्ट्रवादीच्या वर्तुळात कळते आहे. मात्र विधान परिषद उमेदवारी घोषित करण्यास विलंब का होतोय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून राष्ट्रवादीचे सुप्रीमो खा. शरद पवार पुण्यात दाखल झाल्याचे वृत्त समजते आहे.