फलटण प्रतिनिधी -
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण येथे महाविद्यालयाचा हिंदी विभाग व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने "हिंदी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा" पार पडला. सदर स्पर्धेत नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ, सौ. वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज इत्यादी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया फलटण चे शाखा प्रमुख मा. श्री. राजेंद्र कांबळे, वेदांत अकॅडमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्रमुख श्री. स्वानंद जोशी, व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा.सौ.एस.एम. मेटकरी इत्यादी प्रमुख पाहुणे लाभले होते. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या हिंदी वक्तृत्व स्पर्धेत नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयातील तृतीय वर्षात शिकत असलेली कुमारी तृप्ती माने हिने बाजी मारली. कु. ज्ञानेश्वरी बिबे आणि कु.रेश्मा सोडमिसे यांच्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले तर कु. शाहिस्ता शेख तृतीय व यश नामदास हे विद्यार्थी उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.
हिंदी निबंध स्पर्धेत यशवंतराव चव्हाण जुनियर कॉलेज मध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकत असणारी कु. रेश्मा सोडमिसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी अनुक्रमे कु. ज्ञानेश्वरी नवगण व कु. साक्षी गायकवाड यांचे निबंध ठरले; तर कु. सानिका भगत व कु. शाहिस्ता शेख यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सदर निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणाचे कामकाज माननीय श्री. गोपाळ सरक (क्षेत्र सहायक, वैध मापन शास्त्र हडपसर पुणे), प्रा. श्री. श्रेयस कांबळे (राज्यशास्त्र विभाग नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय) व प्रा. सौ. एस. एम. मेटकरी (यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय) यांनी निष्पक्षपणे पूर्ण केले.
"हिंदी प्रबोधन सप्ताह"च्या निमित्ताने राष्ट्रभाषा हिंदी दिवस कार्यक्रम, निमंत्रितांची मार्गदर्शनपर व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांची महाविद्यालयात रेलचेल होती. सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण चे व्यवस्थापक श्री राजेंद्र कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले की, "स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेतृत्व व इतर कलागुणांची भर पडते. वक्तृत्वाचा व्यवसाय, नोकरी व विविध क्षेत्रांमध्ये उपयोग होत असतो. चे विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करत असतात तेच विद्यार्थी सामाजिक राष्ट्रीय कार्यातही सहभागी होतात. स्पर्धांमुळे वक्तृत्व, लेखन, साहस, समायोजन, अनुशासन, अभ्यास, वाचन, अभिनय, इत्यादी कलागुणांचा विकास होतो. आजचे युग हे स्पर्धेचे योग असल्याने आपणास जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे तसेच आपला दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे." हिंदी राष्ट्रभाषेचा सन्मान करणे सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन करत भारतीयांना जागतिकीकरणाच्या युगातही हिंदीला पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विजेत्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हिंदी व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदेश बिचुकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. श्रेयस कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी पाहुण्यांचा स्वागत सत्कार केला. बी. कॉम. भाग III ची विद्यार्थिनी कु.शिवांजली ढेंबरे हिने आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक प्राध्यापिका तसेच कर्मचारी उपस्थित होते.