फलटण प्रतिनिधी -
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील - मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता येथील श्रीराम मंदिर येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राजे गटाकडून कडाडून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे धैर्यशील मोहिते - पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभला विशेष महत्व प्राप्त होत आहे.