भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे व म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा केलेला प्रयत्न त्याचबरोबर फलटण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क अभियानामध्ये आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले ची प्रतिक्रिया फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी धैर्य टाइम्स शी बोलताना दिली.
पुढे बोलताना अनुप शहा म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये गेली तीस वर्षे रावण रूपी विचार चे फोफाफत आहेत ते दहन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
यावेळी सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे फलटण शहर भाजपाध्यक्ष अमोल सस्ते, राजेंद्र काकडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.