सातारा दि. 28 : सामाजिक न्याय विभागांतर्गत सातारा जिल्ह्यातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षात महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील व्यावसायिक विभागाच्या रिक्त जागेश्वर गुणवत्ता व प्रवर्ग निहाय प्रवेश देण्यात येत असून प्रवेश अर्ज भरण्यास 20 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्याच्या व तालुक्यातील ठिकाणी कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये विनामूल्य प्रवेश अर्ज वाटपाचे काम सुरु आहे. तरी गरजू विद्यार्थी व पालकांनी संबंधित वसतिगृहात प्रवेश घ्यावा अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा (02162-298106) संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.