फलटण प्रतिनिधी : देशभरातील वंचिताच्या मन, मेंदू अन मनगटात दहा हत्तीचे बळ निर्माण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरा यांच्या देशभर सभा होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून साताऱ्यात ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे भव्यदिव्य सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या सभेचे आयोजन संविधान जनजागृती विचार मंच, सातारा यांच्या वतीने करण्यात आले असून ही सभा साताऱ्यातील ऐतिहासिक होण्याचे संकेत मिळत आहेत. तरी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात होऊन गेला मात्र या देशातील शोषित, पिडीत, वंचितांच्या जगण्याला आजही न्याय मिळत नाही. उलट दिवसेंदिवस अन्याय, अत्याचार अन सांस्कृतिक दहशतवादाने सर्वसामान्य बहुजनांचे जगणं मुश्किल होऊन जात आहे. मराठा आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला, अबाल वृद्धावर जीवघेणा लाठीहल्ला, मराठा तरुणांना जातीपातीत अडकावून भडकावून इतरांवर जीवघेणा हल्ला करायला लावून जेल मध्ये अडकावून जीवन उध्वस्त करायचे षडयंत्र चालविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या नांदेडच्या युवकाला ठार केले. साताऱ्यातील पानवण येथे मातंग महिलेला भर चौकात निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. पुसेसावळीत जातीय दंगल घडवून निष्पाप मुस्लिम युवक नुरुल हसनला जीवे मारले गेले. तेथील धर्मस्थळावर हल्ला चढवून समाजमन कलुषित केले. वर्धनगड, बलवडी येथील मुस्लिम निष्पापांना घरात घुसून जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. थोडक्यात धर्म अन जातीच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद माजवून मराठा दलित मुस्लिम, ख्रिश्चन, ओबीसीच्यावर जुलूम सुरु केलाय. त्यामुळे या देशात संविधान स्वातंत्र्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. इथली मनुवादी व्यवस्था सत्तेच्या चाव्या हाती घेऊन पावलोपावलो संविधानाची पायमल्ली करताना दिसत आहे.
संविधानात धर्मनिरपेक्षता आहे, मात्र धर्मसापेक्ष कारभार राबवला जातोय. संविधानात समाजवाद सांगितलाय, परंतु प्रत्यक्षात भांडवलशाहीचा विळखा घट्ट होताना दिसतोय. संविधानात समता आहे, मात्र व्यवहारात विषमता आहे. हा अंतर्विरोध संपविण्यासाठी या देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या विचारव्याखेतील समता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. नव्हेतर ते आपले सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. आज देशातील एकता आणि एकात्मता धोक्यात आहे. जात अन धर्माच्या नावाखाली काही विघातक शक्ती सामाजिक सलोखा बिघडविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. गुंड, जातदांडगे अन धनदांडगे यांनी संसदेत घुसखोरी करून लोकशाही खिळखिळी केलीय.
ओबीसिंचे सामाजिक, राजकीय आरक्षण धोक्यात आणले आहे. गरीब मराठा, शेतकरी, श्रमिक-कष्टकरी जनतेला कोणी वाली राहिला नाही. अशावेळी आपण सर्वांनी सतर्क होऊन संविधानातील न्याय, हक्क, अधिकारासाठी, शोषित, पिडीत, वंचितांच्या संरक्षणासाठी, संविधान बचावासाठी एक व्हायला हवे, नव्हेतर ही काळाची हाक आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातान्यात ७ ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य समेचे आयोजन करण्यात आले. तेव्हा 'हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है उदघोषणा' अधिक मजबूत करण्यासाठी सभेला लाखोंच्या संख्येने या असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांची लक्षणीय उपस्थिती राहणार : अध्यक्षा - सौ. सपना भोसले, फलटण शहर महिला आघाडीॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७ ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील सभेला महिलांची लक्षनिय उपस्थिती राहणार आहे. तर फलटण शहरातून हजारो बांधव या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.