Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
महात्मा फुले यांच्या नामफलकाच्या विटंबनेप्रकरणी फलटणमध्ये निदर्शने फलटण नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षक पदी मुकेश अहिवळे एसटी बससाठी विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट : फलटणच्या पूर्व भागातील बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी आज फलटणची बत्तीगुल होणार - सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत मेंटेनन्स करीता विजपुरवठा राहणार बंद कृषिदुतांनी रांगोळीतुन रेखाटला विविध सुचीसह गावचा नकाशा जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी रिपाईच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना फलटण येथे अभिवादन प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता : सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड फलटणच्या एका अकॅडमीत विद्यार्थ्याला मारहाण : विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजनबद्दल विडणी चे सरपंच सागर अभंग सन्मानित गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा गुरुवारी 31 जुलै रोजी प्रथम पुण्यस्मरण आमदार सचिन पाटील यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन : मतदारसंघाच्या समृद्धीसाठी शंभू महादेव चरणी प्रार्थना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे कृषी विद्यार्थ्यांकडून डाळिंबावर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे बिबी येथे प्रात्यक्षिक विडणी - धुळदेवचे आजी माजी सदस्यांचा भाजपा प्रवेश - राजे गटाला जोरदार धक्का दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी महायुती सरकार पूर्ण ताकतीने उभे : आमदार सचिन पाटील नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्थेच्या राजाळे येथे वृक्षारोपण - आ. सचिन पाटील यांची उपास्थिती जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी फलटणमध्ये रक्तदान शिबिर जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे दुःखद निधन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची फलटणकरांना प्रतीक्षा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात दुसरी : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी स्वीकारला पुरस्कार धुमाळवाडीत पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन अवघ्या आठ तासात पर्दाफाश ! पणन विभागाने सुपर मार्केट गाळा भाडे कमी करणेबाबत निर्देश दिलेस फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस मान्य- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर नंदकुमार काकडे यांचे निधन बाजार समितीतील गाळे धारकांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश : मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती रिपाई ची राजकीय रणनीती संदर्भात शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी फलटण येथे बैठक : नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूकीची रणनीती ठरणार बापूसाहेब तथा बी. टी. जगताप यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचे विडमॅट प्रात्यक्षिक फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उल्लंघन ? अकॅडमी व्यवसाय उफाळले नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन करणार – सनी काकडे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप

प्रा. रमेश आढाव यांच्यासारखा उमेदवार फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मिळणे हे फलटणकरांचे नशीब

प्रा.रमेश तुकाराम आढाव यांच्या कार्याचा घेतलेला आढावा
टीम : धैर्य टाईम्स

प्राध्यापक रमेश आढाव  :  एक झुंजार पत्रकार 

समाजावर होणाऱ्या अन्यायावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार करणारा होता वाचन, मनन चिंतन करणारे एक सर्जनशील व्यक्तिमत्त्व.

नामांतर आंदोलनात लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होऊन नामांतरासाठी प्रयत्न करणारे भीमसैनिक.समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रकाशित होणाऱ्या 'एकता दर्शन' या साप्ताहिकाचे संपादक 

विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्यायाची लढाई लढणारा कृतिशील कार्यकर्ता.

मवाळ पण तितक्याच जोरकसपणे आपले विचार प्रकट करणारे स्पष्टवक्ते समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे शिक्षणप्रेमी 

अनेक ठिकाणी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन व प्रबोधन करणारे सामाजिक कार्यकर्ते. प्राध्यापक रमेश तुकाराम आढाव यांना सर्वजन आढावसर म्हणूनच ओळखतात.अंगाने सडसडीत लाभलेल्या आढाव सर त्यांच्या त्या सफेद कुर्त्यामुळे सहज ओळखले जातात.सरांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. पण त्यांच्या वडिलांवर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांच्यासह सर्व भावंडांना शिक्षणाची संधी मिळाली.सरांच्या आईचे नाव लालूबाई होते. त्यांना विलास व सुरेश हे भाऊ व तोलन नावाची एक बहीण आहे.सरांचे कुटुंब मजुरीवरच अवलंबून असायचे. माधवदास बाबा, महादेव आढाव, नान्याबा अण्णा(नाना महार), बी.पी आढाव, निवृत्ती आढाव यांच्यामुळे आंबेडकरी चळवळ जवळून पाहता आली.सरांचे वडील स्वतः १९३९<साली फलटण येथे झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला हजर होते.त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा घेतली.शिक्षण, राहणीमान आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत प्रबोधनाचे कार्यक्रम करीत ब।सी कांबळे, रा.सू.गवई,बॅरिस्टर खोब्रागडे यांचे कार्यक्रम पाहत गेले.त्यातून मुलांना उच्च शिक्षण देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सरांच्या वडिलांनी शिवलाल नानकचंद दोशी यांच्याकडे १८ वर्ष मजुरीने काम केले. दारी धरल। शिवलाल दोशी यांनी मुलांना शिकवण्याचा सल्ला दिला.सरांच्या वडिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. तिन्ही मुलांना पदवीधर केले.

       आढाव सरांचे प्राथमिक शिक्षण गुणवरेच्या प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी महाविद्यालयात झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात दाखल झाले.विद्यार्थी दशेपासूनच सरांनी आंदोलने केली. अकरावीमध्ये शिकत असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळत नव्हती म्हणून पंचवीस विद्यार्थ्यांसह त्यावेळचे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना भेटले आणि या अन्याय या विरुद्ध न्याय मिळवला. इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी ते गजानन चौकातील फलटण विद्यार्थी बोर्डिंगमध्ये राहिले. पुढे बी.कॉमपर्यंतचे शिक्षण घेताना ते कॉलेजच्या वसतिगृहात राहिले. इथे असताना डबा हा एसटीने यायचा. कधी कधी एसटी चुकली तर वडील स्वतः डबा घेऊन चालत फलटण पर्यंत यायचे.सरांनी शिकावं, मोठं हवं समाजासाठी काहीतरी करावं असं त्यांना कायम वाटायचे. सरांनी मिळणाऱ्या सुट्टीचा वापर मौजमजा करण्यासाठी कधीच केला नाही ते स्वतः शेतात मजुरीला जायचे. 

       महाविद्यालयीन काळात त्यांनी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. नामांतराच्या चळवळीत उपराकार लक्ष्मण मानेंच्या समवेत सहभागी घेतला.एन.एस.एस सारख्या संघटनेने सक्रिय काम केले. राष्ट्रीय प्रौढ साक्षरता अभियानात सहभाग घेऊन साक्षरतेचे काम केले. व्याख्यानाच्या संधी मिळाल्या त्या त्या ठिकाणी सामाजिक चळवळ सांगून समाजप्रबोधनाचे काम केले.मराठा विद्या प्रसारक मंडळात नोकरी मिळाली. पण तिथे ते रमले नाहीत. कारण राजकीय दबावाखाली काम करणे त्यांच्या स्वभावात नव्हते ते या संस्थेतून बाहेर पडले.त्यांनी त्या ठिकाणी अकाऊंटंट व सहकार हे विषय शिकवले.

        नूतन मराठा महाविद्यालयातील सरांचे मित्र भरत सुरसे यांनी साप्ताहिक काढण्याचा सल्ला दिला.अशोकलाल दीक्षित यांना बरोबर घेऊन साप्ताहिकाची परवानगी मिळवली आणि १९९३ ला 'एकता दर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू झाले.साप्ताहिकांचे प्रकाशन प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या हस्ते झाले. यासाठी माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर, श्री. सुभाषराव शिंदे,अरविंद भाई मेहता, रवींद्र बेडकिहाळ, प्रा.विजय खुडे, दत्तोपंत देशपांडे उपस्थित होते.समाजाच्या व्यथा वेदना मांडण्यासाठी हे पत्रक काढले. निंभोरे येथील आश्रमशाळेच्या उभारणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.बेबी ताईंच्या 'जिणं आमचं' या पुस्तकाचे पुनर्लेखन केले यामुळे साहित्य क्षेत्रातील अनेक लोकांशी संपर्क त्यांचा आला.सरांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले. बी.कॉम ला असताना रिपब्लिकन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले.पुढे फलटण तालुका बेरोजगार युवक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

 केंद्रीय मंत्री खासदार रामविलास पासवानांनी समावेत. . 

भारत सरकारचे तत्कालीन केंद्रीय रेल्वे व दूरसंचार मंत्री रामविलास पासवान यांच्या बरोबर काम केले. त्यांची समाजासाठी आणि तळागळातील माणसांसाठी काम करण्याची तळमळ पाहून रामविलास पासवान साहेबांसोबत सरांनी काम केले.गोरगरीबांना न्याय देणारा अभ्यासू नेता म्हणून सर रामविलास पासवान साहेबांकडे आकर्षित झाले.१९९६ ला खासदार असताना पासवान साहेबांना घरी बोलावले.कस्तुरबा मैदानावर त्यांच्यासोबत भाषण केले. भारतभर दौरे काढल। रेल्वे बोर्डावर व भारत संचार बोर्डावरही सल्लागार सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना रामविलास पासवान साहेबांमुळे मिळाली.

पत्रकार म्हणून काम करण्याची संधी आपल्याला कशी मिळाली ?

मला लोकप्रिय दैनिक लोकमतमध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्राध्यापक सिकंदर अहिवळे यांनी माजी लोकमतच्या सातारा आवृत्तीचे उपसंपादक बाबुराव शिंदे यांच्याशी ओळख करून दिली.त्यांनी मला आधार दिला त्यामुळे मी टिकलो. पुढे तरुण भारत या दैनिकाचे तालुका स्तरावरील काम पाहिले. तरुण भारताचे तत्कालीन सातारा जिल्हा आवृत्ती प्रमुख प्राध्यापक अशोक शिंदे यांनी काम करण्याची संधी दिली.आजही मी दैनिक तरुण भारतचे काम करत आहे.

आताच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय वाटते?

आधुनिक पत्रकारिता सर्वसामान्यांना न्याय देईल असे सांगणे कठीण आहे. वृत्तपत्र समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाबरोबरच व्यावसायिक क्षेत्र बनले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्र आणि आताची वर्तमानपत्र यात फार मोठी तफावत आहे. स्पर्धा वाढली आहे. रंगीबेरंगी, आकर्षक, छपाई यासाठी पैशाची गरज भासू लागली आहे.त्यामुळे ही वर्तमानपत्र न्याय देतीलच असे नाही. वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी समाजाचे वास्तव दर्शन दाखवणारी बातमी मुख्य संपादकांकडे पाठवली तरी व्यावसायिक दृष्टी असणारा वर्तमानपत्राचा मालक व संपादक या बातमीला अग्रक्रम देईलच असे नाही. ही वस्तुस्थिती आहे.ते कोणीही नाकारू शकत नाही.

आजच्या शिक्षण व्यवस्थेविषयी आपल्याला काय वाटते ?

 शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण केला पाहिजे. शिक्षण हक्क विधेयक जे नुकतेच पारित झाले आहे त्यामुळे मुले आठवीपर्यंत नापास होणार नाहीत. त्यात काही चांगल्या गोष्टी सुचवण्यात आल्या असल्या तरी हे धोरण बहुजन समाजाला मारक आहे. याचा मी निषेध करतो हे धोरण मला मुळीच मान्य नाही खरंतर शिक्षण सक्तीचे व मोफत असायला हवे.

 समाजावर दिवसं दिवस अन्य अत्याचाराच्या घटना घडत असताना नुकताच खैरलांजी हत्याकांडाचा निकाल लागला या विषयी आपल्याला काय वाटते ?

खैरलांजी सारख्या अमानुष घटना या देशाला भूषण नाहीत या खटल्यात न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी उच्च न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय हा राजकीय दबावापोटी दिला आहे.त्यामुळे आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये आपले लोक असायला हवेत.त्याशिवाय निरपेक्ष न्याय मिळणार नाही. पूर्वी दलितांची चळवळ राजकीय सत्तेला सुरुंग लावणारी होती. पण आता ही चळवळ उरली नाही.पॅन्थर सारखी लढाऊ संघटनेची आज गरज आहे. चळवळही सामाजिक विचाराने प्रेरीत असावी.

राजकीय चळवळीविषयी आपल्याला काय वाटते ?

फुले , शाहू , आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ता हा जागृत असतो. तो चळवळीतूनच समाजकारण, राजकारण शिकलेला असतो.हुजरेगिरी त्याला चालत नाही.प्रस्थापित राजकारण्यांना तो त्यामुळे चालत नाह। त्याला संधी नाकारून हुजरेगिरी करणाऱ्यांनाच सत्तेत संधी मिळते.यासाठी स्थानिक पातळीपासूनच अगदी संसदेपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची माणसे पोहोचली पाहिजेत.आजच्या काळात पैसा हा सर्व काही बनला आहे.त्याने चळवळीला खिंडारं पाडली आहेत. आजच्या काळात बुद्धीजीवी वर्गाचा पैशाने पराभव केला आहे. लोकप्रतिनिधी होण्यासाठी फक्त पैसेवाले पात्र आहेत.

धार्मिक कार्याविषयी आपल्याला काय वाटते ?

धम्म मार्गदर्शक आहे. त्यामुळे धम्म समजावून सांगण्यासाठी सुशिक्षित धम्म प्रचारक व प्रसारक गाव पातळीवर तयार व्हायला पाहिजेत.बुद्धांचा विचार हा घरोघरी गावोगावी वाडय़ावस्त्यांवर पोहचला पाहिजे धम्म आणि राजकारण यांची गल्लत करून चालणार नाही.बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असायला हवे. धम्माचा प्रचार करणाऱया राष्ट्रीय व राज्यपातळीवरील संघटनांमध्ये समन्वय असायला हवा.लोकांना कृतिबद्ध कार्यक्रम द्यायला पाहिजे. धर्माच्या कार्यासाठी समाजानेच आर्थिक पाठबळ द्यायला हवे.

ग्रामीण भागात तुम्ही वाढला. तिथे तुम्ही चळवळी उभारल्या. आपलं काम कशा स्वरूपात आकाराला आले?

ग्रामीण भागात अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा आणि भयंकर जातीयता होतीच त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढे द्यावे लागले.गावातील धडका बंद करणे असो की समाज प्रबोधनासाठी व्याख्यानमालेचे आयोजन असो आम्ही चळवळही गतिमान करतच राहिलो. पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम घेतले.व्यसनमुक्तीपासून ते रक्तदान शिबिराचे आयोजन केले. धार्मिक कार्यक्रमातून धम्माचे विचार पोचवण्याचा प्रयत्न केला.

तरुणांसाठी आपण काय सांगाल ? 

तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. मोक्याच्या जागा पटकावून समाजासाठी कार्य करावे.प्रशासकीय पदावर गेल्यानंतर समाजापासून आपली नाळ तुटू देऊ नये. विविध क्षेत्रात करिअर करावे. व्यसनापासून दूर राहून समाज बांधवांना मदत करावी.वाचन, मनन, चिंतन करावे. महापुरुषांच्या स्वप्नातील समताधिष्ठित भारत तयार करण्यासाठी प्रयत्न करावा.

राहून गेलेली एखादी गोष्ट कोणती ?

कार्यकर्ता तयार करणारी प्रशिक्षण शाळा उभी करायची आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण दिले जाईल. समाज व्यवस्था तयार होण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.

सीमाप्रश्नाचा जो वाद चालला आहे यावर आपल्याला काय वाटते ?

 भाषावाद व प्रांतवाद असायला नको आहे. बहुसंख्यांक भाषिकांनी अल्पसंख्यांक भाषिकांवर अन्याय करू नये. भाषावर प्रांतरचना असता कामाने असे मला वाटते.

आपल्याला काय करायला आवडते ?

वाचन नाट्यसंगीत ऐकणे. कला व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणं.

आपल्याला काम करण्याची प्रेरणा कशी मिळते ?

समाजाचे वास्तव दर्शन, अन्याय अत्याचार पाहून त्याविरुद्ध काम करण्याची प्रेरणा मिळते.

आपल्या जीवनातला अविस्मरणीय क्षण ?

प्रतिकूल परिस्थितीत असतानाही एक रुपयात प्रवेश मिळाले. फी न भरल्याने शेती शाळेतून हाकलले होते.पण शिवाजीराजेनी सांगितले की गरिबांच्या मुलांसाठी शाळा काढली आहे. पुन्हा शाळेत घेतले. बारामतीला तुळजाराम चतुरचंद कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी दोन ओळींची चिठ्ठी दिली. तसेच डॉ. जे.के गोधा यांनी मदत केली.हे क्षण महत्त्वाचे वाटतात तसेच ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुसेगाव येथे ज्ञानज्योती पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण अविस्मरणीय वाटतो.

           तसेच साहित्य क्षेत्रात डॉ. बाबा आढाव, ग.प्र प्रधान, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. रामनाथ चव्हाण, पुष्पा भावे, उल्का महाजन,वर्षा देशपांडे,निळू फुले,भारत पाटणकर, नागनाथ अण्णा नायकवडी, भाई वैद्य यांच्या समवेत काम करतानाचे क्षण हे अविस्मरणीय क्षण आहेत.

आपल्या जडणघडणीत मदत करणारे आपले शिक्षक कोणते?

प्राचार्य शिवाजीराव भोसले शिकवायला नव्हते पण त्यांचा सहवास व मार्गदर्शन मोलाचे वाटते.तसेच प्राचार्य एस पी शिंदे( टीसी कॉलेज बारामती) प्राध्यापक राऊत, प्राध्यापक आर व्हि. फडतरे, प्राध्यापक ए. वाय शिंदे,प्राध्यापक डॉ.मधुकर जाधव , प्रा.अे.जे कुलकर्णी यांचे मला विशेष सरकारे लाभले.

 आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात घरच्यांची साथ कशी मिळाली ?

माझ्या प्रवासात पत्नीची साथ मोलाची आहे. घरच्यांचे सांगणे एकच होते ते म्हणजे सामाजिक चळवळीसाठी कितीही वेळ द्या. घरची चिंता करू नका. कुटुंबाने खूप सहकार्य दिले.

 मुलाखातकार : फलटण च्या आंबेडकर चळवळीचे अभ्यासक तथा साहित्यिक  सोमनाथ घोरपडे, फलटण

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER