फलटण : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना विविध मान्यवरांनी फलटण येथे अभिवादन केले.
फलटण येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार सचिन पाटील जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.