खरेच आहे... फणस वरून कितीही कडक, काटेरी असले तरीही आतून तेवढेच मुलायम व गोड असते हे जसे सर्वश्रुत आहे तसेच फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर हिंदुराव नाईक निंबाळकर होय. आपल्या स्वभावातून अनेकांना कडक वाटत असले तरीही हृदयातून सर्वसामान्यांकरीता मातृत्वाची भावना जोपसणारे अवलिया नेतृत्व म्हणजे समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर.
- सागर अभंग, लोकनियुक्त सरपंच विडणी ता. फलटण.
कैलासवासी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा आचार, विचार व नेतृत्वाचा वारसा लाभलेले फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर यांचा आज दिनांक २७ मार्च रोजी वाढदिवस त्यानिमित्त अनुभवलेले दादा...
अगदी काहीच नाही... तरीही दूरदृष्टी... वडील हिंदुराव यांची जिंकण्याची सकारात्मक ऊर्जा व हृदयात सतत लोकांसाठी प्रेम व समाजसेवा करण्याची वेडी भक्ती घेऊन कायमच लोकांच्यात रममान होणारे समशेरदादा.
अगदी काही दिवसांपूर्वीच फलटणची कन्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर देविका घोरपडे हिचे फलटण शहरात लागलेले डिजिटल बॅनर नगरपालिका प्रशासनाने नियमांचे बोट दाखवत काढले त्यावेळी समशेरदादांची "दादागिरी" फलटण शहराने पहिली व देविकाचे बॅनर पुन्हा कसे झळकू लागले हे संपूर्ण शहराने पहिले आहे.
पक्ष, जात-पात, उच्च -नीच याच्या पलीकडे विचार प्रत्यक्ष रुजवणारे समशेरबहाद्दर निंबाळकर हे सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यातच अपल्याला दिसतील. वडील माजी खासदार कै. हिंदुराव नाईक यांच्या राजकीय आखाड्यातील डावपेचावर राजकीय विरोधकांना चारी मुंड्या चितकरीत बंधू रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेतून थेट संसद भवनात पाठवण्याची किमया समशेरबहाद्दर यांच्या विविध संकल्पना व राजनीतीतून शक्य झाल्याचे म्हटले जाते.
फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक त्याच बरोबर विरोधी पक्ष नेता म्हणून काम करीत असताना समशेरबहाद्दर यांनी राजकारण विरहित काम करीत अनेकांना राजकीय धक्का दिल्याचेही हे बोलले जाते. लहानपणापासूनच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत समशेरदादा यांना समाजकारण व राजकारण याचे अक्षरशः वेड असल्याचे अनेकजण म्हणतात. तर तत्कालीन शिवसेना पक्षाची सातारा जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र पहिली राजकीय विजय प्राप्त केलेली ग्रामपंचायत म्हणजे फलटण तालुक्यातील पिंपरद ग्रामपंचायत होय. वडील माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने समशेरबहाद्दर यांनी बंधू रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत ग्रामीण भागातही आपली राजकीय ताकत वाढवत असल्याचे हे संकेत होते याच ग्रामीण भागातील वाढवलेले नेटवर्क पुढे जिल्हा परिषद -पंचायत समिती मध्ये चांगले यश देऊन गेले ते दादांच्या दूरदृष्टीनेच. तदनंतर फलटण तालुक्यातील सर्वात मोठया विडणी सारख्या ग्रामपंचायतीवर राजकीय परिवर्तन करीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणली.
नाईक निंबाळकर कुटुंबातून असूनही अगदी सर्वसामान्य जीवन जगत गरीब, वंचित व राजकीय दृष्टीने मागास लोकांचे प्रतिनिधित्व खासदार हिंदुराव यांनी केले. खरे तर त्यांच्या राजकीय यशाचे विशेषण होते असे म्हणावे लागेल. अगदी हेच सूत्र समशेरदादा व खासदार रणजितसिंह या बंधूनी आपल्या राजकीय जीवनात अंगीकरल्याने अनेकांना अचंबित करणारे राजकीय यश त्याना मिळाले हे वेगळे सांगायला नकोच.
अगदी कमी वयातच बलाढ्य राजकीय शक्ती समोर फलटणचे नगरसेवक, विरोधीपक्ष नेता अशा विविध जबाबदाऱ्या समशेरदादा यांनी लीलया पार पडल्या आहेत. त्यांना भावी राजकीय जीवनात मोठया संधी मिळतील हे सांगण्यासाठी आता कोण्या ज्योतिष्याची गरज नाही हे वेगळे सांगायला नकोस... दादांना समजासेवेची मोठी संधी मिळो तर त्यांचे जीवन निरामय राहो याच त्यांना शुभेच्छा....