समझने वालोंको इशारा काफी होता हैं.... असं म्हटलं जात. मात्र आज फलटण तालुक्यात एका व्हाट्सअप स्टेटसची भलतीस चर्चा सुरु आहे. कारण ते व्हाट्सअप स्टेटस आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे. महाराज साहेबांनी व्हाट्सअप स्टेटस मधून इशारा देऊनही फलटण तालुक्यात मात्र भलतीच चर्चेला उधाण आले आहे.
ना. रामराजे यांच्या व्हाट्सअप स्टेटस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ असून त्याखाली ' कळेल ही आशा ' अशा प्रकारे शब्द लिहिले आहेत. त्यामुळे जानकरांना हा इशारा कळाला असेल हे वेगळे सांगायला नको. मात्र उतावळे कार्यकर्ते या व्हाट्सअप स्टेटस ची तालुक्यात उलट सुलट अर्थात चाय पे चर्चा करतानाची चर्चा आहे.
वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह व कळेल ही आशा या शब्दामधूनच रामराजे राष्ट्रवादी बरोबरच राहणार असल्याचे उदबोधन स्पष्ट दिसते आहे. तूर्त तरी तालुक्यात सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळेल अशी शक्यता आहे.
मात्र गुवाहाटीच्या वारी नंतर भाजपाचे राजकीय धक्कातंत्र काय करेल याचा नेम नाही. त्यामुळे व्हाट्सअप स्टेटस मधून इशारा मिळाला असला तरी नक्की काय होणार यांची वाट पाहिलेलीच बरी... तूर्तास... Wait and wathch...