फलटण प्रतिनीधी :- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांची छत्रपती शिवाजी हायस्कूल, वाखरी ची इमारत दुरुस्त करणे किंवा नवीन इमारत उभारण्यास ग्रामपंचायत अथवा वाखरी ग्रामस्थानी पर्यायी जागा दिल्यास आम्ही नवीन इमारत उभारण्यास आम्ही तयार आहोत. शाळा ज्या जागेवर उभी आहे ती जागा वन विभागाच्या मालकीची असून वन विभागाने आजखेर दुरुस्ती करण्यास परवानगी दिली नाही तसेच यापूर्वी याबाबत आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी केले.
वाखरी ता. फलटण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने शाळेच्या खोल्यांची पडझड़ झाली असून त्या अनुषगाने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे सचिव सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी अशी माहिती दिली की, श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या वाखरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची इमारत वाखरी ग्रामस्थांच्या पुढाकाराने व सहकार्याने १९६३ साली उभारण्यात आली आहे. वाखरी येथील शाळेची इमारत जेथे उभी आहे ती ८७ गुंठे जागा वन विभागाची म्हणजेच महाराष्ट्र शासनाची आहे.
यापूर्वी 2019 मध्ये इमारत दुरुस्तीचा आणि नवीन खोल्या बांधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी वनविभागाने आम्हां सर्वांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे त्याठिकाणी बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे तसेच दुरावस्था झालेल्या शाळेची नवीन इमारत नव्याने उभारण्यासाठी वनविभाग परवानगी देत नाहीत नसल्याने तेथे शाळेची सुसज्ज नविन इमारत उभारने किंवा दुरुस्ती करणे शक्य होत नाही यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक बरोबरच मुलभूत अशा स्वच्छतागृह, व्यायामशाळा, वाचनालय, प्रयोगशाळा आदी प्रकारच्या सुध्दा सुविधा उपलब्ध करुन देण्यास असक्षम ठरत आहोत असे सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले शाळेसाठी ग्रामपंचायतीने किंवा कोणी खाजगी व्यक्तीने जागा दिल्यास आम्ही त्या जागेवर नवीन
इमारत उभारण्यात तयार आहोत विद्यार्थांच्या हितासाठी गावपातळीवर सर्वांनी एकत्र येऊन जागेचा तिढा सोडवावा आम्ही त्वरित इमारत उभारतो असे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले जिल्हाधिकारी सातारा, उप वनसंरक्षक, सातारा इत्यादी शासकिय कार्यालयांकडे आमच्या संस्थेमार्फत नव्याने शाळा बांधकाम करण्याकरीता प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याचा सतत कागदोपत्री व समक्ष पाठपुरावा सुरू आहे असे सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले.