फलटण प्रतिनिधी - माढा लोकसभा मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विकासकामे ही येणाऱ्या निवडणूकीत जमेची बाजू राहणार असून यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रभाव दिसेल असे सांगतानाच फलटण तालुक्यातून खासदार रणजितसिंह यांना मोठे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही उद्योजक राम निंबाळकर यांनी दिली. ते निंबळक (ता. फलटण ) येथे कोपरा सभेच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, विधानसभा प्रभारी सचिन कांबळे - पाटील,जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, माजी सरपंच काशीराम मोरे, प्रवक्ते संतोष सावंत यांच्यासह फलटण पूर्व भागातील विविध मान्यवर उपस्थित होते.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे गावचे सुपुत्र असून फलटण पूर्व गावातील 36 गावातून त्यांना अधिका-अधिक मताधिक्य राहिल असे यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व उद्योजक राम निंबाळकर या मातब्बर नेत्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यातून मोठे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहिर केल्याने फलटण तालुक्यातून खासदार रणजितसिंह यांना मोठे मताधिक्य मिळेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
उद्योजक राम निंबाळकर यांचा फलटण पूर्व भागात मोठा राजकीय गट आहे. निंबळक, वाजेगाव,गुणवरे, मठाचीवाडी,साठे, सरडे, पवारवाडी, आसू, गोखळी, खटाकेवस्ती आदी भागात निंबाळकर यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. उद्योजक राम निंबाळकर हे पूर्व भागातील मोठे नेतृत्व मानले जाते.