सातारादि. 25 : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महाबळेश्वर तालुका प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहे. गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यलयाने चित्रकला, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धां, जनजागृतीपर होर्डीग लावून व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.
या जनजागृती मोहिमेध्ये शाळेती विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला, मतदान माझे कर्तव्य, माझे मत, मतदान कशे करावे, मतदान राजा जागा हो लोक शाहीचा धागा हो, माझ मत माझ्या भविष्यासाठी अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या व भित्तीपत्रके तयार करुन मतदान जनजागृती करण्यात आली.