फलटण प्रतिनिधी : 30 एप्रिल
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी आज दिनांक ३० रोजी फलटण तालुक्यातील ९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत शांततेत मतदान पार पडले एकूण ९२% झाले मतदान पार पडले.
फलटण तालुक्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. फलटण तालुक्यातील ९ मतदान केंद्रावर मतदान झाले.कृषी पत व बहु. सह. संस्था ४ मतदान केंद्रावर १६३४ एकूण मतदान पैकी १५२४ म्हणजेच सरासरी ९३% मतदान झाले.
तर ग्रामपंचायत ४ मतदान केंद्रावर ११८७ एकूण मतदान पैकी १०६० म्हणजेच सरासरी ८९% मतदान झाले व व्यापारी व आडते १ मतदान केंद्रावर ८२ एकूण मतदान पैकी ८१ म्हणजेच सरासरी ९९% मतदान झाले एकूण सरासरी पाहता एकूण २९०३ मतदान पैकी २६६५ मतदान म्हणजे एकूण ९२% झाले.
मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांच्या मागर्दर्शनखाली विविध शासकीय अधिकारी कार्यरत होते. सर्व मतदान केंद्रावर मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवार, दि. १ मे रोजी सकाळी १० वाजता फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर सभागृह (मार्केट यार्ड) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.