फलटण प्रतिनिधी -
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरातील प्रत्येक प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहा साठी 8 कोटी रूपये मंजुर केल्याचे सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे माध्यमातून संयुक्त फलटण शहरातील प्रभागांचा पाहणी दौरा सुरु करण्यात आला आहे.
प्रत्येक प्रभागासाठी दिलेले 50 लाख रुपयांचे मूलभूत सुविधांसाठी जसे की गटर, पिण्याची पाईप लाईन व बोळांचे काँक्रीटीकरण करणे यासाठी खर्च करावयाचे आहेत अशा सूचना मा. खासदार व आमदार यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आज मंगळवार पेठ प्रभाग क्रमांक २-३ मधून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली आहे.
त्यावेळी दौऱ्यात उपस्थित गटनेते अशोकराव जाधव, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, फलटण शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहूल निंबाळकर, संजय गायकवाड, अमित भोईटे, अमोल भोईटे, सनी मांढरे, राजू निंबाळकर, महेश घाडगे, अमोल घाडगे, संदीप घाडगे, सुनिल घोलप, संग्राम सावंत,लतिफभाई तांबोळी , सुधीर अहिवळे, महेश जगताप, युवराज काकडे , प्रशांत काकडे, सुनील अहिवळे , सौरभ मोरे, सुमित काकडे, वैभव मोहिते, विशाल अहिवळे व भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.