फलटण प्रतिनीधी : फलटण कोरेगाव या अनुसूचित जाती साठी राखीव असणाऱ्या मतदारसंघासाठी महायुती मधून राष्ट्रवादी काँगेस पक्षातर्फे सचिन सुधाकर कांबळे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह ना निंबाळकर खासदार नितीन पाटील ,जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील ,सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,डी.के.पवार , शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नानासाहेब इवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महायुतीच्या जागा वाटपा मध्ये फलटण- कोरेगाव या विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याने भाजपाचे विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता कालच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची अधिकृत उमेदवारी घोषित केली होती त्यामुळे आज दुपारी त्यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत महायुतीतर्फे फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाकरीता उमेदवारी अर्ज भरला
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ढोल ताशा, गजी ढोल नृत्य, हलगी या वाद्यांच्या गजरात जंगी मिरवणूक काढत मोठे शक्ती प्रदर्शन करत शहरातील मुख्य चौकातून काढण्यात आली सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून मिरवणूक तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आली होती यावेळी मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सचिन कांबळे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांचेकडे अर्ज दाखल केल्यावर सचिन कांबळे पाटील यांनी आमचा विजय निश्चित असून आम्ही फलटणच्या गतीमान विकासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले.